महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत 4 टक्के वाढ (Govt Employees DA Hike Update) झाली, तर कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात किती वाढ होईल, हे उदाहरणाद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याचे मूळ वेतन दरमहा 53,500 रुपये असेल. अशा स्थितीत 46 टक्क्यांनुसार सध्याचा महागाई भत्ता 24,610 रुपये असेल. आता डीए 50 टक्के वाढल्यास ही रक्कम 26,750 रुपये होईल. याचा अर्थ कर्मचाऱ्यांचा पगार 26,750 रुपये 24,610 = 2,140 रुपये प्रति महिना वाढेल. केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना दरमहा 41,100 रुपये मूळ पेन्शन (Govt Employees Salery Hike) मिळते. 46 टक्के डीआर दराने पेन्शन मिळवणाऱ्यांना 18,906 रुपये मिळतात. जर त्यांचा डीआर 50 टक्के झाला, तर त्यांना महागाईपासून दिलासा म्हणून दरमहा 20,550 रुपये मिळतील. अशा परिस्थितीत, जर डीएमध्ये 4 टक्के वाढ झाली, तर त्यांची पेन्शन दरमहा 1,644 रुपयांनी वाढेल.