वास्तविक, 1986 मध्ये खरेदी केलेल्या रॉयल एनफिल्ड बुलेट 350 चे बिल सोशल मीडियावर समोर आले आहे आणि व्हायरल होत आहे. या बिलात दाखवण्यात आलेल्या बाईकची किंमत पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. या बिलात बाइकची ऑन-रोड किंमत फक्त 18,700 रुपये होती, जी आजच्या तुलनेत सुमारे 10 पट कमी आहे. इंटरनेटवर व्हायरल होणारे हे बिल 36 वर्षांचे आहे. रॉयल एनफील्ड बुलेट 350 स्टँडर्ड मॉडेलचे व्हायरल बिल झारखंडमधील संदीप ऑटो कंपनीने जारी केले आहे.