शेतकऱ्याचा अनोखा जुगाड! जनावरांचे गवत हातांऐवजी चक्क पायांनी कापणे होणार शक्य; पाहा Video

Desi Jugaad Video : शेतकऱ्यांच्या मेहनतीची कोणीही बरोबरी करू शकत नाही. चांगेल पीक घेण्यासाठी ते ऊन, वारा, पाऊस, वादळ कशाचीही पर्वा न करता रात्रंदिवस शेतात घाम गाळत असतात. इतकेच नव्हे, तर शेतीव्यतिरिक्त इतर जोडधंदेही ते तितक्याच मेहनतीने करतात. असे अनेक शेतकरी आहेत की, जे कमी मेहनतीत आणि कमी वेळात शेतीसह अनेक कामे पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे जुगाड वापरतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी वेळात भरपूर काम करता येते. अशाच प्रकारे एका शेतकऱ्याने जनावरांना दिला जाणारा चारा कापण्यासाठी नवा जुगाड शोधून काढला आहे; जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि ज्याने जुगाड करणाऱ्याचे कौतुकही कराल.

 

👉 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी ; इथे क्लिक करा 👈

 

एका शेतकऱ्याने चारा कापण्यासाठी जुगाडाच्या मदतीने असे एक यंत्र तयार केले आहे की, ज्यामुळे हातांची मेहनत कमी होणार आहे; पण पायांचा मात्र चांगला व्यायाम होईल. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चारा कटिंग मशीनला एक पट्टा बसविण्यात आला आहे आणि त्याचा दुसरा भाग थोड्या अंतरावरील सायकलला बसविण्यात आला आहे. पण, पूर्ण सायकलऐवजी त्यात फक्त सायकलची फ्रेम, सीट व रिम आहे. ती सायकल जमिनीवर कायमस्वरूपी फिट करण्यात आली आहे; जेणेकरून ती मागे-पुढे होणार नाही. यावेळी एक व्यक्ती सायकलवर बसून पेडल मारते, त्यामुळे चाक फिरू लागते आणि त्याला जोडलेल्या बेल्टमुळे मशी च्या फ्लायव्हील्सही फिरू लागतात. यावेळी दुसरी व्यक्ती नियमितपणे मशीनमध्ये चारा टाकत राहते आणि तो चारा कापून खाली पडत राहतो.

 

👉 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी ; इथे क्लिक करा 👈

 

@sandeepjaat.1 नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे; जो आता अनेकांना फार आवडला आहे. त्यावर कमेंट करीत एका युजरने लिहिले की, काहीही असो. हा जुगाड नंबर वन आहे. दुसऱ्याने लिहिले- त्यामुळे तुम्हाला पायांचा व्यायाम होईल. तिसऱ्याने लिहिले की, याला गावातील स्थानिक अभियंता म्हणतात. पण, हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment