पिवळे दात होतील मोत्यासारखे पांढरे शुभ्र ! करा फक्त हे घरगुती उपाय

Home Remedies Teeth : पांढरे शुभ्र दात आपल्या व्यक्तिमत्वात भर घालत असतात. दातांवर पिवळेपणा असेल तर चारचौघांत वावरतानादेखील कमीपणा वाटू शकतो. दातांचा पिवळेपणा घालवून ते स्वच्छ करण्यासाठी बहुतांश वेळा डेंटिस्टकडे जाऊन भरमसाठ पैसा खर्च केला जातो. परंतु काही घरगुती उपायांद्वारे ही समस्या दूर केली जाऊ शकते. पिवळे दात पांढरे शुभ्र करण्यासाठी काही उपायही करता येऊ शकतात. यासंदर्भात ‘एनडीटीव्ही इंडिया हिंदी’नं वृत्त दिलं आहे. पिवळ्या दातांमुळे आरोग्याशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पिवळे दात असलेल्यांना अनेकदा कमीपणाची भावना मनात निर्माण होऊ शकते. तसंच पिवळ्या दातांवर पायरिया जमल्यास अवेळी दात तुटण्याची भीतीही असते. पिवळेपणामुळे दात किडणं, तोंडाचा वास येणं, दाढदुखी, दातांतून रक्तस्राव अशा समस्या उदभवू शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही घरच्याघरी दातांसाठी टीथ व्हाईटनिंग पावडरची निर्मिती करू शकता.

 

👉 व्हिडिओ पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈

 

दातांवरील पिवळेपणा घालवून त्यांना पांढरं शुभ्र करण्यासाठी या पावडरची चांगली मदत होऊ शकते. अशी तयार करा टीथ व्हाईटनिंग पावडर दात पांढरे शुभ्र करण्यासाठी पावडर घरच्याघरी तयार करता येते. यासाठी शिंदेलोण, लवंग, दालचिनी, ज्येष्ठमध यांची प्रत्येकी एक चमचा पावडर घ्यावी. याच्यासह वाळलेली कडूलिंबाची व पुदिन्याची पानंही घ्यावीत. सर्व सामग्री मिक्स करून त्याची पावडर बनवून ती एका डबीत भरू ठेवावी व नियमित त्याचा वापर करावा. हेही वाचा – व्यायाम करूनही वजन कमी होत नाही?, व्यायामासह हा आहार ठरेल फायदेशीर अशी वापरा पावडर दररोज ब्रश करताना आपण ब्रशवर ज्या पद्धतीने टूथपेस्ट घेऊन त्याचा वापर करतो, त्याप्रमाणे ही पावडर ब्रशवर घेऊन वापरावी. ही पावडर वापरायला सुरू केल्यानंतर काही दिवसांतच दातांवर नैसर्गिक चमक आल्याचं दिसेल व पायरियाची समस्याही दूर होईल. या गोष्टींची घ्या काळजी दाताचं पिवळेपण घालवून ते पांढरे शुभ्र बनवण्यासाठी दररोज तुम्हाला दोन वेळा ब्रश करणं आवश्यक आहे.

 

👉 व्हिडिओ पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈

 

तोंडातून घाण वास येत असेल तर माऊथ फ्रेशनर वापराला सुरू करायला हवं. दात स्वच्छ करण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल काही वेळ तोंडात ठेऊन चूळ भरावी. यामुळे पायरियाची समस्या दूर होईल. दातांसाठी कडुलिंबाच्या पावडरचा उपयोगही करता येऊ शकतो. यामुळे दातांची व्यवस्थितरित्या स्वच्छता होते. मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्यास दात स्वच्छ होण्यासाठीही मदत होऊ शकते. पांढरे दात पिवळे पडत असतील तर दातांमध्ये जमा होत असलेल्या घाणीला फ्लॉक्सच्या मदतीने बाहेर काढले जाऊ शकतं. दरम्यान, दैनंदिन जीवनात आपण शरीरातील इतर अवयव दुखत असतील तर तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार घेतो. परंतु, दातांच्या बाबतीत डेंटिस्टकडे जाण्यास बऱ्याचवेळा दुर्लक्ष केलं जातं. वास्तविक पाहता दातांच आरोग्यही सांभाळलं जाणं तितकंच आवश्यक असतं. घरगुती उपायातून ते आरोग्य टिकवलं जात असेल तर ते करायलं हवं.

Leave a Comment