नमो शेतकरी योजना दुसरा हप्ता जमा होणार, GR आला

Namo Shetkari Yojana : राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने १७९२ कोटी रुपयांच्या वितरणास मान्यता दिली आहे. मागील अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत प्रतिवर्षी शेतकऱ्याला सहा हजार रुपये देण्याचे सरकारने जाहीर केले होते. एप्रिल, मे, जून आणि जुलै या चार महिन्यांचा पहिला तर ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यांचा दुसरा हप्ता देण्यात येणार होता. मात्र आता तीन महिने उशिराने दुसरा हप्ता देण्यात येणार आहे.

 

👉 कधी जमा होणार ; येथे क्लिक करून पहा 👈

 

पहिला हप्ता ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला. त्यात आता वाढ झाली असून अंदाजे ९५ लाख शेतकऱ्यांना दुसरा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याआधी नमो शेतकरी महासन्मानचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

 

👉 कधी जमा होणार ; येथे क्लिक करून पहा 👈

 

केंद्रसरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेद्वारे दरवर्षी तीन टप्प्यात शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्यात येतात. याप्रमाणेच राज्य सरकारही ‘नमो’अंतर्गत सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देत आहे. राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी १७२० कोटी रुपये वितरित केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या निधीचे वितरण शिर्डी येथून केले होते. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या महिनाअखेरीस ‘नमो’चा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे.

Leave a Comment