खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार आणि महागाई भत्त्यात वाढ, केंद्र सरकारची मोठी भेट

State Employee Da News : होळीपूर्वी देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार मोठी भेट देऊ (Govt Employees Salery) शकते. केंद्र सरकार होळीपूर्वी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा विचार करत आहे. ही वाढ 4 टक्क्यांनी होऊ शकते. केंद्र सरकारच्या औद्योगिक कामगारांसाठीचा महागाई भत्ता CPI डेटाच्या आधारे ठरवला जातो. सध्या CPI डेटाची 12 महिन्यांची सरासरी 392.83 आहे. या आधारे, डीए मूळ वेतनाच्या 50.26 टक्के असेल. कामगार मंत्रालयाचा लेबर ब्युरो विभाग दर महिन्याला CPI-IW डेटा प्रकाशित करतो.

सरकारच्या या निर्णयाचा केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक दोघांनाही मोठा फायदा होणार आहे. सरकार सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करणार (7th Pay Commission) आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सरकारकडून महागाई भत्त्यासोबतच पेन्शनधारकांच्या महागाई सवलतीत वाढ केली जाते. दरवर्षी, DA आणि DR सहसा जानेवारी आणि जुलैमध्ये दोनदा वाढवले ​​जातात. शेवटची वाढ ऑक्टोबर 2023 मध्ये झाली होती. तेव्हा डीए 4 टक्क्यांनी वाढवून 46 टक्के करण्यात आला होता. सध्या डीएमध्ये 4 टक्के वाढ होण्याची शक्यता (4 Percent DA Hike Update) आहे. मार्च महिन्यात महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा झाली, तर त्याची अंमलबजावणी जानेवारीपासून होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांनाही मागील महिन्यांची थकबाकी मिळणार आहे.

 

👉 पगार किती वाढणार ; येथे क्लिक करून पहा 👈

Leave a Comment